मुंबई-गोवा महामार्ग पंधरा तासांपासून ठप्प; पर्यायी मार्गांनी वळवली वाहतूक !

मुंबई – गोवा महामार्ग पंधरा तासापासून ठप्प आहे(Mumbai – Goa highway blocked for fifteen hours). रत्नागिरीतील लांज्याजवळ असणाऱ्या एका पुलावरून गॅसचा टँकर पलटल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे (Highway closed due to overturned gas tanker). याटँकरमध्ये एलपीजी गॅस (LPG gas) होता. दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधला गॅस पूर्णपणे सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच हा महामार्ग पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. मुंबई – गोवा महामार्गावर झालेल्या अपघातामुळे पर्यायी मार्गाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. काल दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास हा टँकर पुलावरून पलटी झाला होता. भारत पेट्रोलियम या कंपनीचा हा टँकर असून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान टँकर पुलावरून थेट नदीत कोसळला.

टँकरमधील गॅस केला जाणार शिफ्ट, नंतरच मार्ग वाहतुकीला मोकळा

या अपघातात गॅस टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान टँकरमधून काही प्रमाणात गॅस लिक होत असल्याची देखील माहिती आहे. गेल्या १५ तासांपासून या महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गॅसमुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे. या टँकरमध्ये २४ ते २८ (24 to 28 kg LPG in tanker) किलो एलपीजी असल्याची माहिती आहे. हा महामार्ग सुरळीत होण्यासाठी अजून चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे आणि पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

टँकरमध्ये गॅस असल्यानं आसपासच्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण आहे. या घटनेसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून आसपासचे रहिवाशी आणि प्रवाशांना देणं गरजेचं होतं. पण जिल्हा प्रशासनाकडून तशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे. प्रशासनाकडून कालपासून एकच दावा सातत्यानं केला जात आहे की, गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीनं या अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी काढून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी, यासर्व गोष्टींसाठी एकूण किती कालावधी लागेल हे स्पष्ट सांगितलं जात नाही. चार ते पाच लागू शकतात असा अंदाज आहे.