Home » नाशिककरांना मुंबई प्रवास सुखकर होणार..?  

नाशिककरांना मुंबई प्रवास सुखकर होणार..?  

by नाशिक तक
0 comment

News For Nashik : मुंबई प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार आता नाशिककरांचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde) यांनी एका प्रसिध्द वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे. राज्य सरकार (State Government) नाशिकच्या (Nashik) रहदारीसाठी नाशिककरांसाठी पुढील काळात आराखडा तयार करत असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर टोल होता(Toll on Nashik-Mumbai National Highway), त्यावेळेस चांगला रस्ता होता. मात्र आता टोल काढून टाकल्याने तो खराब झाला, मात्र या महामार्गाबाबत चर्चा करणार आणि सकारात्मक भूमिका घेणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

उद्या (११ डिसेंबर, रविवार) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी राज्यभरातील रस्त्यांबाबत बोलले. दरम्यान त्यांना मुंबई-नाशिक महामार्गावरही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी नाशिक- महामार्गाच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. “नाशिक- मुंबई महामार्ग हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या महामार्गाबाबत पुढील काही दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक-मुंबई महामार्ग हा महत्वाचा राज्यमार्ग आहे. याबाबत लवकरच सकारात्मक भूमिका घेणार” असं आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना “मुंबई-नाशिक हायवे आहे, मात्र त्याची परिस्थिती पाहता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) जेवढा जगतोय, मुंबई-नाशिक हायवेच्या शेवटच्या घटकात मोजतो आहे, इतकी वाईट परिस्थिती झाली आहे” असं विचारण्यात आलं. यावर मुख्यमंत्री म्हणाले, त्याच्याबद्दल आम्ही विचार करतोय, कारण तो नॅशनल हायवे आहे. मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर टोल होता, त्यावेळेस चांगला रस्ता होता. मात्र आता टोल काढून टाकल्याने तो खराब झाला, तो नॅशनल हायवेचा असला तरी सुद्धा राज्य सरकार नाशिकच्या रहदारीसाठी नाशिककरांसाठी पुढील काळात आराखडा (Plan for Nashik-Mumbai Highway) तयार करत आहे, राज्य सरकार नाशिककरांसाठी महत्वाचा निर्णय घेत असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल”, अशी महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गासाठी मुख्यमंत्र्यांचा नवा प्लॅन काय असणार ? याची उत्सुकता नाशिककरांना लागली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!