रावसाहेब दानवेंचा इम्तियाज जलील यांना सल्ला. म्हणाले, स्वतःच्या मुलाचे नाव ‘औरंगजेब’ ठेवा !

औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र विरोध दर्शवला. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने या निर्णयाविरोधात मोर्चे काढले तर औरंगाबादच्या नामांतर विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील जलील यांनी सांगितलं. अशात जलील यांच्या या विरोधाला प्रत्युत्तर देत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी त्यांना एक सल्ला दिलाय.

‘आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग गावाच्या नावाचं बघा, असा सल्लाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी खा. इम्तियाज जलील यांना दिला आहे. शहराच्या नावावरून खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून रावसाहेब दानवे यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा असा सल्ला इम्तियाज जलील यांना दिला आहे. औरंगाबादचा नामांतर संभाजीनगर करण्याची आमची मागणी होती. ती पूर्ण झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील प्रस्ताव मंजुरीवेळी उपस्थित होते. त्यामुळे तेदेखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

राजकारण करण्यासाठी आम्ही महापुरुषांची नाव घेत नाही. आधी शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा मग आम्ही स्वतः प्रस्ताव घेऊन येऊ. दोन दिवस एक नेते आले. असं म्हणत खासदार जलील यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध केला होता. त्यावर रावसाहेब दानवेंनी खासदार जलील यांना हा सल्ला दिला आहे.