शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’ या खोचक सवालाला नारायण राणेंनी सडेतोड उत्तर दिलं. बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. यावेळी टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, असा सवाल केला होता. यावर बोलताना राणे यांनी “महाराष्ट्रात ८५ टक्के साक्षरता आहे पण, ती मातोश्रीमध्ये नाही. ” असा टोला लागावाला होता, दरम्यान राणे यांच्या या प्रत्युत्ताराला उत्तर देत. त्यांनी ‘MSME चा फुल फॉर्म सांगावा’ असं म्हंटलय.
राणेंच्या साक्षरते वरून केलेल्या टीकेवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी “१६ वर्ष ते याच मुद्द्यावर आहे त्यांने एम एस एम ई (MSME) चा फुल फॉर्म सांगावा. मी सोडून देई” असा टोला लगावला आहे. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या हातातून गेलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातच येणार होता. त्याचे माझ्याकडे पुरावे देखील आहे, असा दावा करत वेदांताच्या अनिल अग्रवाल यांच्या पत्राचे वाचन केले. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज करत “माध्यमांसमोर वेदांताबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी डिबेट करावी,”असं म्हंटल आहे. (The unconstitutional Chief Minister should debate with me in front of the media regarding Vedanta: Aditya Thackeray).
“महाराष्ट्रात 85 टक्के पेक्षा जास्त साक्षरता आहे पण, ती मातोश्रीमध्ये नाही. उद्धव ठाकरे यांचं बुलढाण्यातील भाषण माझ्याकडे आहे. म्हणे, भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर?, तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा. कोरोनाचे औषध खरेदीत किती केली. किती खोके, पेट्या औषधामध्ये गेल्या?”, असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. असे आरोप करत “माझ्याकडे कंपन्यांचा पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहेत की, किती टक्के मागत होते. औषधांअभावी अनेक माणसं गेली. आणि हे टक्के मागत होते”, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.