त्र्यंबकला पोकलेनचा धक्का लागून चिमुरड्याचा मृत्यू, पोकलेन चालक फरार

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील रिंग रोड लगत असलेल्या भांगरे आळी परिसरात भुयारी गटाराचे काम सुरू असताना पोकलेन मशीनचा धक्का लागल्याने बारा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू (Child Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अखिल योगेश गमे असे या बालकाचे नाव आहे.

त्र्यंबकेश्वर शहरातील भांगरे आळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुयारी गटाराचे (Drainage Line Work) काम सुरू आहे. यावेळी येथील काही मुले जवळच खेळत होती, हे काम सुरू असताना पोकलेनचा अखिलला जोराचा धक्का लागला. तो खाली पडल्याने पोकलेन (Poclain Machine) खाली सापडला. यात अखिल गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात (Trimbakehswer Sub District Hospital) नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) पाठवले. त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर पोकलेन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत सदर पोकलेन चालकावर कारवाई ची मागणी केली आहे. याबाबत त्र्यंबक पोलिसात (Trimbak Police Station) गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.