Video : घ्या! बालभारतीच्या पुस्तकांना लागणारे हातचं दारूच्या ग्लासात!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक भांडार येथील कार्यालयात अधिकारी दारू पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे यांना मद्य सेवन करतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर पाथर्डी फाट्यानजीक बालभारतीचे दालन आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र असून याठिकाणी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या लक्ष्मण दामसे नामक अधिकारी दारू पितांना आढळून आला आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये हि धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

इथे पहा Video :

https://www.youtube.com/watch?v=7caPvzUXxEw

स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून ते कार्यालयात दारू पीत असल्याची माहिती संबंधित सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार आज त्या ठिकाणी पाहणी केली असता सदरचा प्रकार आढळून आला. सदर अधिकारी कार्यालयात मद्य पितांना बसलेला दिसून आला. यावेळी त्यास धड बोलताही किन्वा चालताही येत नव्हते. पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेत मेडिकलसाठी रवाना केले आहे.

बालभारती पाठ्यपुस्तक भांडार या पुस्तकांची सगळी वाहतूक या माणसाची हात लागून पुढे सुरू होते, तर मुलांना काय आदर्श मिळणार? पाठ्यपुस्तक महामंडळामध्ये असा दारूडा अधिकारी कसा असावा ? त्यांच्या हाताखालचे माणसं त्यांची पिळवणूक रात्रंदिवस सहन करतात? सरकारी कर्मचाऱ्यांनी राजरोसपणे अशा पद्धतीने सामान्य जनतेची थट्टा करणे चालू केले आहे.

  • जितेंद्र भावे, आप नाशिक