Video : मुंबई नाक्यावर ‘बर्निंग कार’चा थरार, चालत्या कारने अचानक पेट घेतला

नाशिक । प्रतिनिधी
चालत्या कारने अचानक (Car Fire) पेट घेतल्याची घटना मुंबई नाक्यावर (Mumbai Naka) आज घडली. भर रस्त्यात कारने पेट घेतल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असून यामुळे भर उन्हात चालणे तर दूर कार चालवणे देखील कठीण झाले आहे. कारण वाहने पेटण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच शहरातील मुंबई नाका परिसरात एका चालत्या कारने (Burning Car) पेट घेतला. मात्र हि बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित गाडी तःबवून रस्त्याच्या कडेला घेतली.

https://www.youtube.com/watch?v=vYyU3_8gO6Y

शिवाय कारच्या बोनेट मधून धुराचा लोट येण्यास सुरवात झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची (Nashik Fire Brigade) गाडी तत्काळ घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला. पण, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी येथे जमली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.