By चैतन्य गायकवाड |
नाशिक : नाशिक शहरात (Nashik city) खून (murder) सत्र सुरूच असून शहरात पुन्हा एक खुनाची घटना घडली आहे. नाशिकच्या अंबड परिसरात (Ambad area) एका कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकाची (manager) हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. नाशिक शहरात अवघ्या १८ दिवसांत ८ हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दिवसाढवळ्या खून होत असल्याने नागरिकांना एकट्याने फिरण्यासदेखील भीती वाटत आहे. ह्या खुनाच्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, अंबड परिसरातील एका कंपनीत (company) काम करणाऱ्या व्यवस्थापकाच्या हत्येने नाशिक हादरले, असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police) घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरु आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अवघ्या १८ दिवसांतील ही हत्येची आठवी घटना आहे. गेल्या २ दिवसांत शहरात ३ जणांवर प्राणघातक हल्ले झाले आहे.
ही बातमी आत्ताच break झाली असून, आम्ही सविस्तर वृत्त update करू.