Video : नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

नाशिक | प्रतिनिधी
मनसेच्या (MNS) अल्टिमेटम दिल्यानंतर आता नाशिकमध्येही (Nashik) पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर (EID) सीबीएस जवळील मनसे कार्यालया बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त (Police Bandi baat) तैनात करण्यात आला आहे.

आज सगळीकडे शहरात ईद आणि अक्षय तृतीयेच्या (Akshay Trutiya) निमिताने उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांच्या कलखंडानंतर प्रथमच ईद व अक्षय तृतीया साजरी होत आहे.

https://youtu.be/UO08s16Mxy4

ईदच्या पार्श्वभूमीवर सीबीएस (Nashik CBS) जवळील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजगड मनसे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नाशिकच्या ईदगाह मैदानावर नमाज पठण असतात. याच ईदगाह मैदानाच्या बाजूला नाशिकमध्ये मनसे कार्यालय असल्याने पोलिसांचा खबरदारी उपाय हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.