चैतन्य गायकवाड :
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी (crime) घटना वाढल्या आहे. त्यात खून (murder), अपहरण (kidnapping), मारहाण, घरफोडी तसेच चेन स्नॅचिंग (chain snaching) अश्या अनेक गंभीर घटना आहेत. त्याअनुषंगाने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik city police) विशेष झडतीसत्र मोहीम राबवली. नाशिक शहर पोलिसांकडून शनिवारी (दि. 4) रात्री उशिरापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस आयुक्तालयाच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झडतीसत्र मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहर पोलिसांनी पायी पेट्रोलिंग (petroling) करत, 113 टवाळखोरांवर तसेच तडीपार गुंडांवरही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात बसून टवाळी करण्याऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 27 तडीपार गुंडांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच अवैधरीत्या (illegally) हत्यार सोबत बाळगणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष झडतीसत्र मोहीम राबवली. पंचवटी (Panchavti), आडगाव (Adgaon), म्हसरूळ (Mhasarul), भद्रकाली (Bhadrakali), सरकारवाडा (Sarakarvada), गंगापूर (Gangapur) आणि मुबईनाका (Mubainaka) या सात पोलिस ठाण्यांचे प्रत्येकी एक असे सात पथके तयार करण्यात आली. या प्रत्येक पथकात एक पोलिस अधिकारी, पाच पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. रात्री 8 ते 11 व मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अनेक टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. या झडतीसत्रात पायी गस्त घालणे, गुन्हेगारांची तपासणी, हत्यार प्रतिबंधक कारवाई, काही गुन्ह्यांमध्ये संशयित असलेले आरोपींची चाचपणी, पोलिस रेकॉर्ड वरील संशयित गुन्हेगारांची तपासणी, तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची तपासणी अश्या अनेक कारवाया करण्यात आल्या.
अवैधरीत्या सोबत हत्यार बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत, तर दुसऱ्या व्यक्तीला मुंबईनाका पोलिस स्टेशन हद्दीतून पकडण्यात आले. पंचवटी आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 29 संशयितांच्या घरी अचानक धडक देत झडती घेतली. त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत, वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 12 व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात आली.