By चैतन्य गायकवाड |
नाशिक : नाशिक शहराच्या (Nashik city) पंचवटीतील (Panchavti) प्रभाग क्रमांक ४, ५, आणि ६ (ward no. 4, 5, 6) मधील बहुतांश भागात उद्या दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या (NMC) पाणीपुरवठा (water supply) विभागाने दिली आहे. महापालिकेकडून पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र (Water Purification Center) येथील तीस लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडण्याचे काम शुक्रवारी (दि. १०) करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटीतील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिक महानगरपालिकेकडून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणीपुरवठा विभाग) यांनी या सूचनेचे निवेदन काढले आहे.
पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील 30 लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडणीचे काम (cross connection) करणे आवश्यक आहे. हे काम शुक्रवार (दि. 10) रोजी हाती घेण्यात येणार आहे. या जलकुंभावरुन रामवाडी जलकुंभ भरणा होत असतो. या जलकुंभावरुन प्रभाग क्रमांक ६ मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पिटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील दत्तनगर, कुमावत नगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणी नगर, नवरंग मंगल कार्यालय परिसर, पेठ नाका व मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड व चिंचबन परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरीओमनगर, पेठरोड वजनकाटा जवळील परिसर, फुलेनगर परिसर, विजय चौक, राहूलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीज मागील रामनगर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसायटी ते युनियन बँक ते निमाणी पर्यंतचा परिसर इत्यादी ठिकाणी देखील पाणीपुरवठा बंद राहील.
या सर्व भागांत शुक्रवार (Friday) (दि. १०) रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शनिवार (Saturday) (दि. ११) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.