नाशिकरांनो गाफील राहू नका, अन्यथा… – जिल्‍हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

नाशिककर गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा एकदा निर्बंध लावण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन गरजेचे असून नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याने त्रिसूत्रीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभराची डोकेदुखी वाढविली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तातडीने बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल (दि.२८) रोजी राजक्यतील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे देखील उपस्थित होते. नाशिकरांना आवाहन करतांना ते म्हणाले कि, दुसऱ्या लाटेला यशस्वी रित्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले ,मात्र अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रोन व्हेरिएंट अतिशय घातक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन तयारी करत आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ओझर विमानतळावर प्रवाशाची प्रवास हिस्ट्री तपासून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. कोरोनाची त्रिसूत्री म्हणजेच सामाजिक अंतर, मास्क ,हॅन्ड सॅनिटायझर अनिर्वाय असणार आहे. आरोग्य सुविधांचा फेर आढावा घेऊन नियोजनाचा पुनर्विचार करणार आहेत. विशेष लसीकरण मोहिमेवर भर दिला जाणार असून त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस लवकरात लवकर घेण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे जीनोम सीक्वेसिंग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.