सावधान : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ.

By चैतन्य गायकवाड

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० जून) कोरोना बाधितांच्या (Corona cases) संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी ६० नवीन कोरोना बाधित (new corona cases) आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ४३ बाधित हे नाशिक महापालिका (NMC) क्षेत्रातील असून, नाशिक ग्रामीण भागातील १३, तर जिल्हाबाह्य ०३ बाधितांचा समावेश आहे.

मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) हद्दीत नवीन एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात एकूण ४८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (दि. २९ जून) ५४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल ६० कोरोना बाधित आढळले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २८० कोरोनाबाधित उपचार घेत (active patients) आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या ८८९९ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधितांची संख्या ४ लाख ७६ हजार ९०६ इतकी झाली आहे. त्यातील ४ लाख ६७ हजार ७२४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९८.०७ टक्के इतके आहे.

देशात १७००० नवीन कोरोना रुग्णांची नोंद…

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल १७ हजार ०७० नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत १४ हजार ४१३ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 23 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशात सक्रिय रुग्णांचा दर (active patient rate) ९८.५६ टक्के इतका आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार १८९ इतकी झाली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण केरळ (Keral) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांमध्ये आहे. केरळमध्ये गुरुवारी ४०८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३६४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.