नाशिक | प्रतिनिधी
क्रेडाई मेट्रो नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ चे उद्घाटन नुकतेच केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डोंगरे वसतिगृह पटांगणात या भव्य क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो चे १४ एप्रिल ते १७ एप्रिल अशा चार दिवस या एक्स्पो चे आयोजन क्रेडाईच्यां वतीने करण्यात आले आहे. ‘हीच ती वेळ’, नाशिकमध्य घर घेण्याची या टॅग लाईन खाली जवळपास ५०० प्रोजेक्ट्स ची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. आपल्या स्वप्नातील घर मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी क्रेडाई संस्थेचे तोंडभरून कौतुक केले. आणि येणाऱ्या काळात नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढण्यास कशी मदत होईल, त्यासंदर्भात ही मदत करण्याचं आश्वासन दिले.
या एक्स्पो मध्य जवळपास ७० डेव्हलपर्स सहभागी झाले आहेत. यात ५०० प्रोजेक्ट्स ची माहिती उपलब्ध आहे. शहरातील प्रत्येक भागात लाखो रुपयांपासून तर करोडो रुपयांपर्यंत आलिशान घरांची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आपल्या स्वप्नातील घरासह, आपण गृहकर्ज कस घ्यायचे याची देखील माहिती उपलब्ध आहे.
या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्यासह क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष रवी महाजन, राजेगावकर सुनील कोतवाल, सुरेश पाटील, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर, एसबीआयचे राजेशकुमार, अनिल आहेर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
त्यामुळे वाट काय बघतायत? डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो ला भेट द्या आणि तुमच्या शंकाच निरासन करून तात्काळ आपल्या स्वप्नातील घर बुक करा, आणि हो फक्त चार दिवस हे प्रदर्शन आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.