By चैतन्य गायकवाड |
नाशिक : शहरातून विविध ठिकाणाहून तब्बल ५ मोटर सायकलची चोरी झाल्याची घटना (Incident of motorcycle theft) घडली आहे. शहराच्या ५ वेगवेगळ्या भागांतून या मोटार सायकल चोरी झाल्या आहे. या घटनेप्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलिस स्टेशन… पंचवटी पोलिस स्थानकात (Panchavati Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी वनिता मनोहर पेखळे (रा. प्लॉट नं. २९, दामोदर नगर, हिरावाडी, पंचवटी) यांची मोटार सायकल चोरीला गेली आहे. हिरावाडी परिसरातील सप्तशृंगी हॉस्पिटलच्या गेट समोरून होंडा कंपनीची काळ्या रंगाची ॲक्टिव्हा स्कूटर चोरी झाल्याची घटना घडली आहे. या स्कूटर चा नंबर एम. एच. १५ एफ. जे. ५५३६ हा आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक खाजेकर या घटनेचा अधिक तपास करत आहे.
आडगाव पोलिस स्टेशन… आडगाव पोलिस स्थानकात (Adgaon Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी आशिष दत्तू चौरे (रा. फ्लॅट नं. ४, साई हाईट्स, निलगिरी बाग, कैलास नगर) यांची मोटार सायकल चोरीला गेली आहे. आशिष चौरे यांच्या राहत्या घरी पार्किंगमध्ये पार्क केलेली केटीएम कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. या मोटार सायकलचा नंबर एम. एच. ३९ एक्स. ०७६७ हा आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार लोहकरे या घटनेचा अधिक तपास करत आहे.
गंगापूर पोलिस स्टेशन… गंगापूर पोलिस स्थानकात (Gangapur Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी विकास मनोहर तर्खडकर (रा. फ्लॅट नं. १८, सरला अपार्टमेंट, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर) यांची स्कूटर चोरीला गेली आहे. सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत पार्क केलेली ब्राऊन रंगाची होंडा ॲक्टिव्हा स्कूटर अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. या स्कूटर चा नंबर एम. एच. १५ जी. एस. ५४६९ हा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहे.
अंबड पोलिस स्टेशन… अंबड पोलिस स्थानकात (Ambad Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी ठक्का कारभारी कोल्हे (रा. साईबाबा नगर, महाकाली चौक, जय नगर, सिडको) यांची मोटर सायकल चोरीला गेली आहे. संभाजी स्टेडीयम च्या मागच्या बाजूला असलेल्या बुरकुले हॉल जवळ पार्क केलेली काळ्या रंगाची मोटर सायकल चोरीला गेली आहे. या मोटर सायकलचा नंबर एम. एच. १५ जी. एच. ८३५६ हा आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार शेख या घटनेचा अधिक तपास करत आहे.
उपनगर पोलिस स्टेशन… उपनगर पोलिस स्थानकात (Upnagar Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी बिहारी यदू रॉय (रा. पाथर्डी रोड, शिवाजी नगर पेट्रोल पंपाच्या समोर, वडनेर दुमाला) यांची मोटर सायकल चोरीला गेली आहे. देवळाली गाव येथील दर्गेसमोर असलेल्या सार्वजनिक बाथरूम लगत पार्क केलेली हिरो कंपनीची काळ्या रंगाची पशन प्रो मोटार सायकल चोरीला गेली आहे. या मोटर सायकलचा नंबर एम. एच. १५ डी. पी. ९६८३ हा आहे. पोलिस हवालदार सातभाई या घटनेचा अधिक तपास करत आहे.