मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणास चोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली असून मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत सदर तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हि बाब पोलिसांपर्यंत पोहचली आहे.

आधीच विवाहित असलेल्या एका इसमाने १८ वर्षाच्या युवतीला पळवून नेल्याच्या रागातून युवतीच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेत त्याला केलेल्या मारहाणीत या इसमाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई नाका परिसरात सहवास नगर मागे हा प्रकार घडला असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात युवतीच्या दोन भावांसह तीच्या नातेवाईकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पाटील अस मृताचे नाव असून यापूर्वी त्याचे दोन लग्न झाले असून त्याला मुले देखील आहेत. असे असताना त्याने पुन्हा सहवास नगर मधील एका युवतीला गुजरातमध्ये पळवून नेले होते.

युवतीच्या नातेवाईकांनी शोध घेत दोघांना गुजरात मधून सहवास नगर येथे आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. संशयितांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.