नाशिक । प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिसांनी एकलहरे परिसरात अट्टल बाईक चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांकडून नऊ मोटारसायकलसह सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत अधिकी माहिती अशी कि, सिन्नर फाटा येथे काही मोटर सायकल चोर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात परिसरात सापळा रचला. यावेळी चार इसम दोन दुचाकी वाहन घेऊन असल्याचे दिसून आले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी योग्य वेळ साधत त्यांना ताब्यात घेतेले.
यामध्ये प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे(२२), यज्ञेश ज्ञानेश्वर शिंदे (वय १९), अमन वर्मा (वय १९), अक्षय राजेश धामणे (वय २६) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या संशयितांकडे अधिक चौकशी केली असता संशयित अमन वर्मा यांच्याकडून विविध कंपनीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले. तर संशयित आप्पा सदाशिव धिवरे रा. पळसे गाव व साजिद शेख या दोन संशयितांकडून सहा मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असून सहा गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. नमूद संशयितांकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरिल गुन्ह्यातील अल्पवयीन संशयित शुभम उर्फ बाशी हार्बीन बेहनवाल याने कन्या कोठारी शाळा येथून चैन स्नॅचिंग केल्याचे काबुल करत आठ ग्राम सोन्याची पोत पोलिसांच्या ताब्यात दिली. दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पाटील व पोलीस शिपाई नर्हेराव करीत आहेत.