नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरातील (Nashik City) विविध भागातून चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणारा युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या (Suspect arrested) असून संशयिताकडून चोरी केलेलं मंगळसूत्र, दुचाकी असा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रकाश भारत कुमावत (Prakash Bharat Kumavat) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अधिक माहिती अशी कि, अंबड पोलिस ठाण्याचे (Ambad Police Station) कर्मचारी यांना सावता नगर येथील युवकाने गंगापूर पोलिस ठाणे (Gangapur Police Station) हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली असता सिडको भागात (Nashik Cidko) त्याने चार चैन स्नॅचिंग केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
तर गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत देखील त्याने केलेल्या चैन स्नॅचिंगचा गुन्हा त्याकडून उघड झाला असून अंबड पोलिसांनी या संशयिताकडून ११६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सातपूर, अंबड पोलिस ठाणे हद्दीतुन चोरी झालेली दुचाकी देखील हस्तगत केली आहे.
सदर संशयित आरोपीतांकडुन अंबड, गंगापुर व सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील एकुण ०९ गुन्हयांतील ०४ मोटार सायकल व ०५ सोन्याचे एकूण ६ लाख ३५ हजार ७५६ रूपये किंमतीचा मुददेमाल केला जप्त करण्यात आला आहे. आणखी काही गुन्हे या संशयिताकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांना असून याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करत आहे..