धक्कादायक ! पतीला ‘सेल्फी’ पाठवण्याची धमकी देत अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी

एका विवाहित महिले सोबत ओळख परिचय करीत तिला पर्यटन व देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांवर घेऊन जात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित विवाहितेला मुंबई येथील रहिवासी असलेला संशयित पुरुषांने मागील वर्षी १८ डिसेंबर ते २८ डिसेंबरच्या दरम्यान पीडितेसोबत शेअर चॅट या ऍप्लिकेशन द्वारे मैत्री केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चार वर्षे त्यांनी वेळोवेळी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर पर्यटनाच्या नावाखाली शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी आदी ठिकाणी फिरवले. यादरम्यान एकत्र काढलेली सेल्फी संशयितांनी विवाहितेच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन बळजबरीने संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भद्रकाली पोलिसांनी फिर्यादीवरून मुंबईत राहणाऱ्या संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप संशयिताला अटक करण्यात आली नसून याप्रकरणी पुढील तपास व चौकशी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पीडी पवार या करीत आहेत.