अन् तेव्हाच ‘त्या’ मानवी सांगाड्यांचं रहस्य उकलणार..!

नाशिक | प्रतिनिधी

नाशकात बंद गाळ्यात केमिकलने भरलेल्या डब्यांमध्ये मानवी अवयव आढळून आल्याने शहर परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनमागे असलेल्या हरिविहार या बिल्डिंगच्या बंद गाळ्यात केमिकलने मानवी शरीराचे डोके, कान, नाक, कवटी असे भाग आढळून आले होते. तर या मानवी अवयवांची तपासणी जिल्हा रुग्णालय आणि न्यायवैद्यक शाळेकडून केल्यावरच त्या मागचे गूढ उकलणार आहे. पोलिसांकडून हे मानवी अवयव सिव्हिल येथे पाठवले जाणार असून पोलीस आणि सिव्हिल रुग्णालय मार्फत हा तपास केला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान अवयव सापडलेल्या गाळ्याच्या मालकाची आणि त्यांच्या डॉक्टर सुपत्रांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अनोटॉमी ऍक्ट अनुसार मानवी अवयव हे अभ्यासाठी वापरले जातात, परंतु या ऍक्ट नुसार इन्स्टिटय़ूट आणि हॉस्पिटल्स असेल त्याठिकाणीच असे मानवी अवयव अभ्यासासाठी परवानगी असते, मात्र इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल्सला देखील यासाठी अनोटॉमी ऍक्ट नुसार रजिस्टर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मात्र बंद गाळ्यात अशा प्रकारे मानवी अवयव सापडल्याने त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यात आता सिव्हिल कडून आलेल्या अहवाला नंतरच या सर्व प्रकारामागचं रहस्य उकलणार आहे.