‘तू सुंदर दिसतेस’ म्हणत काढली छेड, मग पोलिसांनी दाखविला ‘इंगा’

नाशिक । प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरात (Mhasrul Area) मैत्रिणीसोबत पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या (Molestation Of Girl) दोघांना पोलिसांनी ताब्यात (Two Arrested) घेतले आहे. तर एकजण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मंगळवारी (दि.१९) रोजी सायंकाळच्या सुमारास हि घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता सायंकाळी रस्त्याने जात असताना अचानक पीडितेच्या भावाच्या ओळखीचा एक जण त्याच्या अन्य दोन मित्रांसोबत तेथे आला. यावेळी पीडितेला थांबवत ‘तू कुठे चालली आहे, असे विचारून ‘तू खूप छान दिसते’, ‘ओठांना लिपस्टिक का लावतेस,’ ‘तू तुझा हात आमच्या हातात का देत नाहीस’, असे म्हणून त्याने व अन्य एका पीडित एकाने पीडितेचे दोन्ही हात पकडले.

त्यामुळे संतापलेल्या पीडितेने दोघांचे हात झटकून ‘थांबा मी माझ्या भावाला बोलाविते’ असे सुनावले. मात्र तरीही संशयिताने ‘जा तुला कोणाला बोलवायचे त्याला बोललो आम्ही कोणाला घाबरत नाही’, असा दम दिला. यावर पीडितेने थेट म्हसरूळ पोलिस ठाणे (Mhasrul Police Station) गाठत घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिस पोलिसांनी फिर्याद घेत संशयितांवर गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चतुर यांच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरत काही तासातच तिघांपैकी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित एका संशयिताचा शोध सुरू असून लवकर त्यालाही ताब्यात घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.