माजी शिक्षणाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्ष सोबत राहत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना नाशिकच्या गोविंद नगर (Govidnangar Nashik) परिसरात घडली. याप्रकरणी पीडित यांच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षणाधिकारी (Former Education Officer) विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा वर्षापूर्वी पीडिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण (ZP Nashik) विभागात काही कामानिमित्त गेले असता तेथे संशयित प्रवीण वसंत अहिरे (रा. गोविंदनगर) यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान संशयित अहिरे यांनी पीडितेला विश्वासात घेत लग्न करण्याचे आमिष दाखवले.

दरम्यान २०१६ पासून आत्तापर्यंत पीडितेसोबत वारंवार शारीरिक अत्याचार (Molestation Case) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी संशयित अहिरे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून ते मागील सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. याबाबत सखोल तपास केला जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.