सातपूरच्या रस्त्यावर थरारक पाठलाग, मोबाईल चोरटा जेरबंद

नाशिक । प्रतिनिधी

शहरात अनेक ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल बळजबरीने चोरणाऱ्या (Mobile Thief) सराईत आणि त्याच्या दोघा अल्पवयीन साथीदारांना सातपूर पोलिसांनी (Satpur Police) बेडया ठोकल्या असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान रविवारी (दि. 24) मोबाईल चोर अंबिका स्वीट (Ambika Sweet) अशोक नगरकडे (Ashok Nagar) येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाच्या (Crime Investigation Squad) टीमने सापळा रचून या मोबाईल चोरट्याला मोटार सायकल सह अटक केली आहे. राजेंद्र कल्लू ठाकूर असे अटक केलेल्या संशयिताच नाव आहे. तर त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यासोबत दोघे अल्पवयीन साथीदार असल्याची देखील माहिती त्याने दिली आहे.

तसेच आपण चोरलेलं मोबाईल हा चोरटा एका मोबाईल विक्री व दुरुस्ती करणाऱ्या इसमाला विकत असल्याची देखील त्याने कबुली दिली असून पोलिसांनी किरण गंगाधर पंगाळे या संशयित मोबाईल दुकानदाराला देखील बेड्या ठोकल्या आहे.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी ०२ लाख १० हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल आणि एक मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली आहे.