सावधान! एटीएमची अदलाबदल होऊन तुमचीही फसवणूक होऊ शकते!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात (Nashik City) वृद्ध व्यक्तींना टार्गेट करून ATM मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला (Suspect Arrested By Mumbai Naka Police) मुंबई नाका पोलिसांनी लातूर येथून अटक केली.

शैलेश शिंगे ( Shailesh Shinge) असे अटक केलेल्या संशयिताच नाव असून या आधी देखील त्याच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहरातील वृद्धांचे ATM बदलून बँकेतून पैसे काढल्याची घटना काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या शिवाजीनगर (Shiwajinagar) येथे घडली होती. हा प्रकार लक्षात येताच लहानु रामभाऊ ठोंबरे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलिस CCTV आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर या संशयिताचा शोध घेत होते.

अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या या संशयिताला अखेर मुंबई नाका पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. दरम्यान त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे