By चैतन्य गायकवाड |
नाशिक : शहरातील अशोकामार्ग (Ashokamarg) परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा पैश्यासाठी छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai naka police station) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार तिघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहित महिलेला ४ वर्षांपासून सतत त्रास दिला जात आहे. तसेच नेहमी या तिनही संशयित आरोपींनी फिर्यादी महिला यांना उपाशी ठेऊन, तुला काही कामधंदा करता येत नाही असे म्हणून त्रास दिला. तसेच तुझ्या आईवडिलांनी आम्हाला लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच या तिघा संशयित आरोपींनी महिलेला मोठी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये पैसे आणण्यासाठी तगादा लावला. पैसे आणले नाही तर, तुला नांदवनार नाही, अशी धमकी देखील दिली. दरम्यान, हे तिघे संशयित आरोपी अशोकामार्ग परिसरातील राहणारे असून, त्यांच्यावर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) गिते अधिक तपास करत आहे.
नाशिकरोड आणि भद्रकाली परिसरातून दोन जणांचे अपहरण … नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या (Nashikroad police station) हद्दीत जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ अपहरणाची घटना घडली आहे. एका १७ वर्षीय मुलाचे एका संशयित आरोपीने काहीतरी कारणातून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिस उपनिरीक्षक (PSI) वाघ अधिक तपास करत आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या (Bhadrakali police station) हद्दीत शिंगाडा तलावाजवळील म्हसोबावाडी येथे देखील अपहरणाचा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून फिर्यादी यांच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय येथून पळवून नेले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आहिरे अधिक तपास करत आहे.