अंबड: सिडको (Cidco) परिसरातील पवननगर (Pvannagar) येथे बलात्काराची गंभीर घटना घडली आहे. संशयित आरोपीने फिर्यादीला वडील व भावाला मारून टाकण्याची धमकी देखील दिली. आरोपीने फिर्यादीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात (Ambad Police Station) तक्रार दाखल (case filed) करण्यात आली आहे. फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने ऑक्टोबर २०२१ पासून वारंवार फिर्यादीच्या वडिलांना व भावाला मारून टाकण्याची धमकी देत, फिर्यादीला त्याच्या घरी जबरदस्तीने नेत तेथे डांबून ठेवत, फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
संशियत आरोपी (रा. मोरे हॉस्पिटल समोर, पवननगर, सिडको) याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पावरा (Police Sub-Inspector Pavara) अधिक तपास करत आहे.