नाशिकचे राजकारण कायमच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पुन्हा एकदा नाशिक राजकीय कारणाने चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात असताना नाशिक शहराच्या राजकारणात खळबळ उडून देणारी वक्तव्य केले आहे. आणि त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुपौर्णिमा निमित्त ठाण्यात होते त्यावेळी त्यांनी माध्यमाची संवाद सातला प्रकारांनी त्यांना नगरसेवक शिंदे गटात सामील होत असल्याबाबत प्रश्न विचारला असता शिंदेंनी या प्रश्नावर मोठे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हनालेत की मुंबईमधील अनेक नगरसेवक पदाधिकारी माझ्यासोबत आहेत त्याचबरोबर नाशिक दिंडोरी येथील नगरसेवक देखील माझ्यासोबत आहेत . त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होती त्यांनी सर्वच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते शिवाय एकही नगरसेवक बाजूला जाणार नाही असे देखील ठामपणे त्यांनी सांगितलं होतं आणि आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक मध्ये नाशिक मधील नेमके कोणते नगरसेवक आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . आता कोणते नगरसेवक आहेत जे शिंदे गटाला समर्थान देत आहेत ते देखील पाहन म्हत्वाच ठरणार आहे . त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेतीलच दोन गट एकमेकांविरुद्ध लढताना पहायला मिळू शकतात .
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी नाशिकची शिवसेना जागेवरच असल्याचे सांगितले होते. आणि नाशिक महापालिकेत शिवसेनाचा भगवा दिसेल असे देखील ठणकाउन सांगितले होते. शिवसेना उद्धवा ठाकरे गटाला शिंदे गट अनेक धक्के देत असल्याचा बघायला मिळत आहे . कल्याण डोंबीवली ,नवी मुंबई नतर आता नाशिक महापालिकेतील नगरसेवक हि धक्का देण्याच्या तयारीत आहेत कि काय असा सवाल उपस्थित झाला आहे.