नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक: सध्या देशभरात कोरोना (corona) बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक रुग्ण वाढत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची आकडेवारी दुहेरी आकड्यात वाढली आहे. शुक्रवारी 20 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात १४ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील असून ग्रामीणचे ३, मालेगाव मनपाच्या हद्दितील १ तर जिल्हाबाह्य दोन बाधितांचा समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ जून) ९ बाधित आढळले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९ जून) कोरोना बाधितांच्या संख्येत १९ ने वाढ झाली होती. शुक्रवारी ही वाढ पुन्हा एकदा दुहेरी आकड्यात असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सध्या जिल्याचा सकारात्मकता दर (positivity rate) २.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराधीन रुग्णसंख्या (active patients) ७१ वर पोहोचली आहे. या उपचाराधीन रुग्णांमध्ये नाशिक मनपा हद्दीतील ५१ रुग्ण, नाशिक ग्रामीण भागातील १० रुग्ण, जिल्हाबाह्य ६ रुग्ण, तर मालेगाव मनपा हद्दीतील ४ रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्यातील कोरोना रुग्णवाढ दुहेरी आकड्यांत… दरम्यान, या वर्षी सुरुवातीला जानेवारी (Janevary) महिन्यात कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीपासून सातत्याने रुग्ण संख्येत घट होत होती. कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने शासनाने निर्बंधही हटवले होते. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने एक-दोन रुग्ण आढळत होते. काही वेळा तर शून्य (zero) रुग्णसंख्या आढळत होती. पण जून (June) महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात तसेच राज्यात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातही जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण वाढत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला ३-४ रुग्ण वाढीचा दर असताना आता हा रुग्णवाढीचा दर दुहेरी आकड्यात पोहोचला आहे. बुधवारी ९ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी १९ कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी 20 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे.