नाशिक । प्रतिनिधी
स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारे येथे हि हृदय द्रावक घटना घडली आहे.
भगवान छगन गुंबाडे असे २५ वर्षीय आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील हिराबाई अर्जुन धुळे यांच्या शेतात काही जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात पहिले असता एक इसम जळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील मधुकर रेहरे यांना कळवले. रेहरे यांनी घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी हजर झाले. मात्र तोपर्यंत इसमाचा जळून मृत्यू झाला होता. यात भंगवान गुंबाडे या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवन यात्रा संपवल्याचे समोर आले. मात्र आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत वणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.