नाशिक | प्रतिनिधी
आंदोलनाच्या इशार्यानंतर महावितरणने (MSEDCL) कालिका पार्क येथील विद्युत पुरवठ्याचा ‘तो’ धोकादायक मिनी पिलर (mini pillar) काढून टाकला. त्यानंतर मंगळवारी (Tuesday) त्याजागी नवीन पिलर टाकला. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल रहिवाशांनी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले.
उंटवाडीतील (Untwadi) कालिका पार्क येथील जय पार्क व श्रीराम रो-हाऊससह परिसरातील चाळीसहून अधिक घरांना विद्युत पुरवठा करणारा मिनी पिलर दोन वर्षांपासून सडल्याने धोकादायक झाला होता. लेखी निवेदने देवून, सतत पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने रहिवाशी हैराण झाले होते. तसेच या ठिकाणी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या प्रयत्नानंतर खंडित झालेली केबल दहा दिवसांपूर्वी नवीन टाकण्यात आली.
महावितरणकडे (MSEDCL) अनेक वेळा पाठपुरावा करूनही मिनी पिलरकडे दुर्लक्ष केले जात होते. हा धोकादायक मिनी पिलर त्वरित काढून, नवीन टाकला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (२८ मे) रोजी देण्यात आला होता. याची महावितरणने दखल घेतली. आज मंगळवारी, ३१ मे रोजी नवीन मिनी पिलर टाकण्यात आला. श्रीफळ वाढवून या कामाला सुरुवात करण्यात आली. महिलांनी मिनी पिलरचे पूजन केले. दोन वर्षांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल रहिवाशांनी शिवसेना (Shivsena), सत्कार्य फाउंडेशन, महावितरणचे अधिकारी माणिक तपासे, प्रदीप वट्टमवार यांचे आभार मानले. सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ, लाईनमन गोकुळ सोनवणे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, सुधीर वाघ, रत्नाबाई पाटील, तृप्ती वाघ, कविता पाटील, नंदा जाधव, निशा ठाकरे, विजया पाटील, अलका दिंडे, बाळासाहेब दिंडे, पी. एन. जाधव, बी. वाय. ठाकरे, के. एस. कोतकर, भगवान पाटील, पांडुरंग पाटील, शशिकांत दंडगव्हाळ आदी हजर होते.