नाशिक जिल्हा घरकुल योजनेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

नाशिक | प्रतिनिधी
महा आवास अभियानात पंतप्रधान आवास योजना (PM Aawas Yojna) ग्रामीण मध्ये गोंदिया जिल्हा (Gondia District) प्रथम ठरला असून धुळे (Dhule) दुसरे आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या सर्वोत्कृष्ट विभागामध्ये नाशिक जिल्ह्याने (Nashik District) तिसरा क्रमांक पटकावला आहे.

राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान (Maha Aawas Campaign) २०२०-२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार (State Level Award) विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी जाहीर केली आहेत.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान २०२०-२१ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात ५ लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम रत्नागिरीतील आदिती आणि वर्धा जिल्ह्यातून ते क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे.

सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय.

सर्वोत्कृष्ट गृहसंकुले : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय.