नाशिक : एकनाथ शिंदेंनी बंड केले त्या पाठोपाठ जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा बंडात सामील होत त्यांना समर्थन दिले. आता त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्ष मजबूतीसाठी नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे.
अल्ताफ खान यांची शिवसेना सहसंपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. (विधानसभा) दिंडोरी, कळवण, बागलाण इथले ते शिवसेना सहसंपर्क प्रमुख असतील
प्रवीण नाईक हे देखील (विधानसभा) मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य ,नांदगाव या शहरांचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख असणार आहेत.
भाऊलाल तांबडे हे येवला,निफाड, चांदवड या शहरांचे
सहसंपर्क प्रमुख असतील.
तसेच नांदगाव व मालेगाव या तालुक्यातील जिल्हा संघटक प्रमुख म्हणून संजय कटारिया म्हणून काम पाहतील.
उपजिल्हाप्रमुख म्हणून संतोष बाळीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते नांदगाव व मालेगाव मध्य चे काम बघतील
संतोष गुप्ता यांची नांदगाव तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्या परिषद न्यायडोंगरी च्या उपतालुकापदी शशी मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मनमाड शहरप्रमुख म्हणून मयूर बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ह्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत खूप मोठे बंड केले, ते शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड आहे असे प्रत्येकाच म्हणन आहे. ते बंड आणि त्या बंडाला मिळणारा पाठींबा आता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेना सोडून जात आहेत. अश्यातच उद्धव ठाकरेंनी सुद्धा आता ग्राउंड लेवलला पक्षाची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे समर्थकांच्या हाकलपट्टी आणि त्यांचा जागी नवीन शिवसैनिकांना संधी देण्याचा धडाकाच आता उद्धव ठाकरे यांनी केला आहे.