त्र्यंबक तालुक्यात खैर लाकडाची तस्करी सुरूच, हरसूल वनपरिक्षेत्रात ट्रॅक्टर जप्त

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबक तालुक्यात (Trimbak taluka) खैर लाकडाची अवैध वाहतूक (seizes logs of khair) सुरूच आहे. त्र्यंबक तालुक्यात हरसूल वनपरिक्षेत्रात (Harsul Forest area) सोमवारी (दि. २५) मध्यरात्री खैर लाकडाची अवैधरीत्या होणारी वाहतूक वनविभागाला रोखण्यात यश आले आहे. मात्र ट्रॅक्टर चालक फरार (Tractor driver Runs) झाला आहे.

हरसूल परिसरात येणाऱ्या देवडोंगरा गावाजवळ (Devdongra Village) खैर लाकडाची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. देवडोंगरा नियतक्षेत्रातील हेदपाडा-कास रस्त्यावर अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाला. त्या आधारे वनकर्मचार्‍यांनी सापळा रचून ट्रॅक्टर (एमएच १४ ईएस ०६०५) व ट्रॉली (एमएच ०४ बी ४९१०) पकडला. त्यामध्ये २० हजार रुपये किमतीचे २१ घनमीटर खैराचे लाकूड जप्त करण्यात आले. मात्र, ट्रॅक्टरचालकासह त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणाची चौकशी नाशिक पश्चिम विभागाचे सहायक वनसंरक्षक (Assistant Forest Conservator of Nashik West Division) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पान आणि इतर तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या तंबाखूविरहित उत्पादनांमध्ये काठा बनवण्यासाठी खैर लाकडाची देशभरात मोठी मागणी आहे.

जप्त केलेल्या ट्रॅक्टर व बाबींचा वनविभागाने तपास सुरू केला आहे. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एन. मौळे, आर. एस. कुवर, एम. एल. पवार, पी. पी. नाईक, के. एस. गवळी, आर. एम. गवळी, संजय भगरे आदी सहभागी झाले होते.