Home » नाशिक पदवीधर निवडणूक; गुलाल कुणाचा ? काउंटडाउन सुरु

नाशिक पदवीधर निवडणूक; गुलाल कुणाचा ? काउंटडाउन सुरु

by नाशिक तक
0 comment

नाशिक : सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झालेली आहे. अनेक घडामोडी या निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाल्या आहे. दरम्यान आता हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान मतमोजणी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे.

मतमोजणीत सुरवातीला पोस्टल मतमोजणी होणार आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत या संपूर्ण निवडणुकीत दिसून आली आहे. त्यामुळे कौल कुणाला याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राज्यातील पाच विभागाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून सर्वाधिक लक्षवेधी मात्र नाशिक विभागाची ठरत आहे.

मतमोजणी प्रक्रिया सुरू;

आज सकाळी नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात झाली असून मतदानातील मतपत्रिकांची आधी तपासणी झाली आहे. यातील बाद मतपत्रिका बाजूला काढून एकूण वैध मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. ही निवडणूक पसंती क्रमांकानुसार झाली असल्याने वैध मतपत्रिकांतून विजयासाठी लागणार्‍या मतांचा कोटा ठरवला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिकांतील मतांची मोजणी सुरू होईल. त्यानुसार सुरवातीला पोस्टल मतमोजणी म्हणजेच मत पत्रांवर आलेल्या मताची मोजणी होत असून एकूण ५८ पोस्टल मतदान झालेले आहे. त्यात ५८ पैकी १२ पोस्टल मतदान अवैध ठरले आहे तर ४६ पोस्टल मतं वैध धरण्यात आले आहे. मात्र ४६ पैकी किती मत कोणाच्या पदरात पडली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाच विभागापैकी सर्वाधिक चर्चा नाशिक विभागाची राहिली आहे. नाशिक विभागात झालेल्या घडामोडींनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. कायमच वेगवेगळे वळण या निवडणुकीत येत गेले. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही निवडणूक सस्पेन्सयुक्त ठरली. सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेस सोबत दुरावा करून भाजपशी जवळीक केली. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांनी भाजपचा हात सोडून महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली. अशा अनेक घडामोडीनंतर आज अखेर मतमोजणी होत आहे. त्यामुळे आता बाजी कोण मारणार याकडे लक्ष लागलेले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक; टपाली मतदान मतमोजणीला

एकूण ५८ पोस्टल मतदान

१२ पोस्टल मतदान अवैध

तर ४६ पोस्टल मतं वैध

४६ पैकी कोणाला किती हे अद्याप स्पष्ट नाही

सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून येत्या काही तासांत निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!