बहुचर्चित नाशिक पदवीधर निवडणुक मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून या फेरीत सत्यजित तांबे आघडीवर तर मविआच्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत. सध्या तांबे आणि पाटील यांच्यामध्ये मोठी चुरस असून कांटे की टक्कर होत आहे. यात एका टेबलवर 1 हजार पैकी 600 हून अधिक मते सत्यजित तांबे यांना पडली आहेत. त्यामुळे तांबे यांनी आघाडी घेतली असून शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.
राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बहुचर्चित अशी ठरलेली नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीच्या सुरुवातीला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात काटे की टक्कर दिसत आहे. मात्र एका टेबलवर 1 हजार पैकी 600 हून अधिक मते सत्यजित तांबे यांना पडली आहेत. तसेच काही टेबलवर सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात काटे की टक्कर सुरु आहे.
अशी होतेय मत मोजणी
एका टेबल वर 1 हजार मत मोजली जाणार असून एकूण २८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एकाच वेळी २८ हजार मतांची मोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. एकूण ५ फेऱ्यामध्ये १ लाख ३० हजार मतांची मोजणी होणार आहे. एका फेरीच्या मोजणीला जवळपास एक ते दीड तास लागणार आहे. पुढील ५ ते ६ तास मतमोजणीची प्रक्रिया चालणार असून नाशिक पदवीधर कोण होतोय याचे निकाल स्पष्ट होतील.