महत्त्वाची बातमी: नाशिकमध्ये गोवरचे संशयित रुग्ण आढळले..

नाशिक : नाशिककरांच्या आरोग्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये गोवरचे संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग तसेच नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये गोवर आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहे.

मुंबई, मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील गोवरचे चार संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये काही दिवसांपूर्वी गोवरचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहराच्या वेशीवर आलेल्या या आजाराने आता शहरात प्रवेश केल्याचा संशय निर्माण झाला आहे. या संशयित चार बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढू नये, यासाठी आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. या संशयित चार बालकांचे रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग नाशिक शहरात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. आरोग्य विभागाने शहरात केलेल्या तपासणीत गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहे. या संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. गोवरचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी आपल्या लहान बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.