नोकरी शोधताय, नाशिकमध्ये भरतोय ऑनलाईन रोजगार मेळावा, असा करा अर्ज

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये (Nashik City) शिकाऊ उमेदवारांसाठी नोकर भरती मेळाव्याचे (Recruitment Meet Up) आयोजन करण्यात आले आहे. मूलभूत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute) तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर (Satpur) येथे (दि.२२) रोजी सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.एस उनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान या शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय उत्तीर्ण (ITI Pass Candidate) उमेदवारांना अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या दोन छायांकित प्रतीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे असे, आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे (Online Employment Meet) आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार (District Skill Development Employment) व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे (Entrepreneurship Guidance Center) हा मेळावा होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दि. २६ एप्रिल ते २८एप्रिल या कालावधीत होणार आहे.

यामधील मुलाखती या मोबाईल, दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअप आदी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे . ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल अशा उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाइल (Android Mobile) धारकांनी प्ले स्टोर मधून महास्वयम (Mahaswayam) हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

असा करा अर्ज

ऑनलाइन रोजगार मिळावा यासाठी महास्वयम वेबपोर्टल वर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर या ऑप्शनवर क्लिक करून नाशिक ऑनलाइन जॉब फायर यावर जनरल अप्रेंटिस आधी रिक्त पदे अधिसूचित करावी तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२५३२९९३२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल ज्या उमेदवारांनी अध्यापक सेवा योजना नोंदणी केली नसेल अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाइल धारकांनी प्ले स्टोर मधून महास्वयम हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी