नाशिक: नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांत खून (murder) तसेच गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस (police) आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश (order) दिले आहेत. या अनुषंगाने शहरात रविवारी (Sunday) मध्यरात्री (midnight) अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ३ तडीपार गुन्हेगारांना अटक (arrest) करण्यात आले. तसेच १० गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह २१ अधिकारी व ११० कर्मचारी सहभागी झाले होते.
वाढलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रित (control) करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पंचवटी (Panchavati), म्हसरूळ (Mhasarul) आणि उपनगर (Upanagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १ ते पहाटी ४ या वेळेत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत शहर व जिल्ह्यातील २१ तडीपार चेक करण्यात आले. यात ३ तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांत अवैध शस्त्रे आहे का, याची तपासणी करण्यात आली. गुन्ह्यात संशयित असलेल्या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत उपायुक्त (DCP) संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त (ACP) वसंत मोरे, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह २१ अधिकारी, ११० कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.