नाशिक । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या, तसेच अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला . त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या घरावर काही लोकांनी काल दगडफेक तसेच चिथावणीखोर आंदोलन केले. यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, शरद पवार देशातले जेष्ठ नेते असून कोणाचेही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. मात्र शासनापुढे अनेक अडचणी असल्याने विलीनीकरण शक्य नाही हे कायम सरकारने सांगितलं. मात्र पेढे वाटण्याचा कार्यक्रम झालेला असताना, कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कर्मचार्यांबद्दल सहानुभूती आहे, मात्र कुटुंबा पर्यंत पोहोचून, दगडफेक करणं निषेधार्हय असून हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा आणि कारवाई करायला हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बोलताना ते म्हणाले कि, कोणत्याही संघटनेच्या आंदोलनाच नेतृत्व महत्वाचं असते. दुर्दैवाने एसटी कामगारांचा नेतृत्व कोण करतय कळत नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे दिशाभूल करत आहेत, त्यात हे नाव येऊ शकत, असाही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले कि, एवढे मोठे आंदोलन होऊनही पोलिसांना थांगपत्ता लागला नाही, गुप्त वार्ता हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो, तुमचे कॅमेरे पोहोचतात, आमचे पोलीस पोहोचत नाहीत, तुमची यंत्रणा जास्त चांगली अस म्हणावं लागेल, असं त्यांनी माध्यमांचे कौतुक करताना सांगितले.
तर महसूल विभाग आंदोलनावर ते म्हणाले कि, या मागण्यांवर अगोदर पासून काम करतो आहोत, शासनामध्ये काही अडचणी झाल्या आहेत, त्यांउळे विलंब लागतो आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या संघटनेचे लोक काल सोलापुरात भेटले. त्याप्रमाणे आम्ही मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करतो आहोत, लवकरच सुरळीत होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिक आयुक्त दीपक पांडेय यांच्या विषयावर बोलण्याचे टाळले. यावेळी ते म्हणाले कि, त्यावर फार बोलणं आवश्यक नाही, सदर प्रकरणाची शासन दरबारी दखल घेतली गेली आहे, की याबाबत आक्षेपार्य वक्तव्य करू नये म्हणून मात्र चूक होत असेल तर नक्की दाखवावी, मात्र संपूर्ण यंत्रणेला दोष देणं हे चुकीचं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.