नाशिक । प्रतिनिधी
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २० एप्रिल पर्यंत पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र गर्दी, जमाव करण्यास तसेच मिरवणूक काढण्यास व सभा घेण्यास पोलीस आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे बंदीचे आदेशीत केले आहे.
सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. यासोबतच १० एप्रिल रोजी रामनवमी,१२ एप्रिल रोजी रामरथ व गरुडरथ,१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,१५ एप्रिल रोजी गुडफ्रायडे,व १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असे सण व उत्सव आहेत.
यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी केली असून पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी शिवाय पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
तसेच जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृहांना लागू नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.