नाशिक । प्रतिनिधी
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिलेल्या आदेशावरून आता नाशिकमध्ये भोंग्याचा आवाजाचा डेसिबल (Decibel of the Buzzing Sound) मोजण्यास सुरवात झाली आहे. सय्यद पिंपरी (Sayyad Pimpri) येथे मशिदी वरील भोंग्याचा आवाजाचा डेसिबल स्थानिक पोलिसांकडून (Nashik Police) मोजण्यात आला आहे.
दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्याच्या आवाजाचा डेसिबल मोजण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने त्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पांडेय हे भोंग्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत…
पोलीस आयुक्त पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबील मोजले जाणार आहेत. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम यावर काम करणार असून यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग (Special Training) देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असून सय्यद पिंपरी येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज डेसिबलच्या साहाय्याने मोजण्यात आला आहे. यावेळी स्थानिक पोलीस उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलिसांकडून भोंग्याचा आवाज मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच नाशिक शहरात हि मोजणी सुरु होणार आहे. दिवसा ५५ तर रात्री ४५ पेक्षा जास्त डेसिबल असल्यास पोलीस कारवाई करणार आहेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्या नंतर नाशिक पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.