नाशिकच्या १८ पोलिसांना महासंचालकांचे पदक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील (Maharashtra Police) ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police Officers) पोलीस महासंचालकांचे (Police Mahasanchalak) पदक जाहीर झाले त्यामध्ये नाशिकच्या दोन पोलीस निरीक्षकांसह (PSI) १६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Police Mahasanchalak Rajnish Sheth) यांनी परिपत्रक जारी करून आदेशित केले आहे कि, ( दि. १३ एप्रिल २०१७) च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागातील (Maharashtra Police Department) विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक (Nashik) मधील पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, डॉ.अंचल मुदगल, श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक उपनिरीक्षक सतीश जाधव, विलास वाघ हवालदार रवींद्रकुमार पानसरे, बाळू लभडे, नितीन संधान, सुनील कुलकर्णी, पोलीस नाईक राहुल जगताप, यतीनकुमार पवार, ईमोद्दीन मुल्ला, दशरथ पागी, अनिल गोरे, अश्विनी देवरे, एकनाथ बाविस्कर, भालचंद्र खैरनार, प्रवीण वाघमारे, प्रकाश महाजन यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले.