गुड न्यूज! अंजनेरीत साकारणार राज्यातील पहिली ट्रेकिंग इन्स्टिटयूट

नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा विभागाने (Nashik District Sport Department) अंजनेरी येथील ट्रेकींग इन्स्टीट्युट (Anjaneri Trekking Institute) (साहसी क्रीडा केंद्र) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) हस्तांतरीत करावे. तसेच जिल्हा क्रीडा विभाग, पर्यटन विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग (Public work Department) यांनी समन्वयाने प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सूचना भुजबळांनी प्रशासनाला दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collector Office) जिल्ह्यातील विविध कामांच्या आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, अंजनेरी हे पर्यटनासाठी चांगले केंद्र असून राज्यातूनच नवे देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. हनुमान जन्मस्थान, ट्रेकिंग पॉईंट (Trekking Point) असल्याने येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे अंजनेरी येथे महाराष्ट्रातील पहिले ट्रेकिंग इन्स्टिटयूट तयार करण्यावर विचार विनिमय सुरु आहे.

दरम्यान हे ट्रेकींग इन्स्टीट्युट तयार होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तेथील स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून संबंधित यंत्रणांमार्फत प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून लवकरात लवकर या सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तसेच कामाला सुरवात होईल. या अनुषंगाने प्रशासनाने तांतडीने पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यापूर्वी करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा. या साहसी क्रीडा केंद्राच्या विकासासाठी प्रशिक्षित व्यक्ती व संस्थांचे सहकार्य घेवून केंद्रासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्यात यावी. तसेच यापूर्वीच्या शिल्लक निधी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या आहेत.