नाशिक | प्रतिनिधी
रमजानच्या (Ramjan) पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) इफ्तार पार्टीचे (Iftar Party) आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्तार पार्टीत सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते.
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे (Corona crisis) सर्व सार्वजनिक सण-उत्सव आणि कार्यक्रमावर प्रतिबंध होता. परंतू यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व नियम शिथिल झाल्यामुळे, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान जुन्या नाशिक (Old Nashik) परिसरात मोठ्या प्रमाणत हिंदू आणि मुस्लिम नागरिक अनेक वर्षापासून एकोप्याने राहतात. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडियाचा (Social Media) वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले. तसेच शहरातील शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना दिले.