नाशिक | प्रतिनिधी
मनसेने (Nashik MNS) दिलेल्या अल्टिमेटमनंतर नाशिक पोलीस यंत्रणा (Nashik Police) सज्ज असून आज सकाळपासूनच पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे तर दुसरीकडे मनसैनिकांकडून शहरातील मशिदीसमोर (Mosque) जय हनुमान चा गजर सुरू आहे.
राज ठाकरे (Raj Thakarey) यांनी नुकतेच तीन पानी पत्र लिहून आत नाही तर कधीच नाही असे सूचक विधान कार्यकर्त्यांना केले. याद्वारे जिथे जिथे भोंगे वाजतील तिथे तिथे हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तर ०३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.
त्यानुसार आज सकाळपासूनच शहरातील विविध भागात हनुमान चालीसा ऐकण्यास मिळत होत्या. काही ठिकाणी मशिदीसमोर मनसैनिक जय हनुमान च्या घोषणा देत होते. यावेळी नाशिक पोलिसांनी अनेकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये जुने नाशिक (Old Nashik), सातपूर या परिसरात पोलिसांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून जुन्या नाशिक परिसरात असलेल्या मस्जिद समोर जय हनुमानच्या घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे घोषणा देणाऱ्यामध्ये महिलांचा समावेश असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच जुन्या नाशिक परिसरात असलेल्या जब्रेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर स्पीकर, वायर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
तर काही ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून अजानच्या वेळेस हनुमान चालीसा लावण्यात आल्या. तसेच हनुमान चालीसा लावलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू असून सरकारवाडा परिसरातून काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात आज फक्त दोन ठिकाणी मस्जिद मध्ये भोंग्यावरून अजान दिल्याची माहिती पोलिसांची दिली आहे.