शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना नाशिक पोलिसांकडून नोटीस

नाशिक । प्रतिनिधी
भोंगे प्रकरणावरून मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip datir) यांना नाशिक पोलिसांकडून नोटीस (Police Notice) बजावण्यात आली असून रमजान महिना (Ramjan Month) सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण झाल्यास थेट कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात (Nashik city) भोंग्यांचा वाद चांगलाच रंगला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर नाशिक मनसे आक्रमक झाली होती. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचे प्रकार घडले. यावरून तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. आदेश काढून नमाज पठणापूर्वी १५ मिनिटे आणि पठणानंतर १५ मिनिटे हनुमान चालीसा न वाजवण्याचे आदेश दिले होते.

मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशांना न जुमानता आम्ही हनुमान चालीअसा लावू असा पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतला होता. ‘आम्ही पोलीस आयुक्त नव्हे तर राज ठाकरेंचे आदेश पाळतो’ अस वक्तव्य दातीर यांनी केले होते. त्यानुसार आज मनसे पदाधिकाऱ्यांना हि नोटीस बजावण्यात आली आहे. सीआरपी कलम 149 प्रमाणे सरकार वाडा पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

तर शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला असून नोटीस प्राप्त झाल्यानंतर दातीर नवीन पोलीस आयुक्तांची भेट गेहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.