नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा आणखी एक दणका, पहा काय म्हणाले…. !

नाशिक । प्रतिनिधी

धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आल्यानंतर आता नाशिक पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्याबाबत आणखी एक दणका दिला असून धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबील मोजण्याचे (Measuring the decibels of bells) आदेश त्यांनी दिले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या भोंगे काढण्यासंदर्भातील वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे ०३ मी पर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था व नजीकच्या काळातील सामाजिक व जातीय सलोख्याला निर्माण होणार धोका याबाबत व्यक्त केली गेलेली भीती लक्षात घेता पांडेय यांनी काल (दि. १८) रोजी स्वतंत्र आदेश जारी केले. यानंतर आज पुन्हा त्यांनी एक आदेश जरी केला असून यामध्ये त्यांनी भोंग्यांच्या आवाजाबाबत नियमावली जारी केली आहे.

दरम्यान पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबील मोजले जाणार आहेत. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ 9Pollution Control Board) आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम (Police Officers Team) यावर काम करणार असून यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग (Special Training) देण्यात येणार आहे.

याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबील एकत्रित मोजणार आहेत. तसेच नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश प्रदूषण मंडळाला दिले आहेत. यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला तडा देणारे वर्तन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनि दिला आहे.