त्र्यंबकमध्ये उटीच्या वारीसाठी २५ हजार भाविक दाखल

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे आज उटीच्या वारीच्या (Ooty Wari) पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने (Sant Nivruttinath Mandir) उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून संत निवृत्तीनाथांच्या उटीवारीसाठी त्रंबक नगरीत पंचवीस हजार भाविक दाखल झाले आहेत.

दरम्यान सात दिवसांपासून मंदिर प्रशासकीय समितीच्या वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. आज दुपारी १ वाजता देवाला सुवासिक थंडगार व शीतल चंदनाचा लेप चढविल्यानंतर जीवनसमाधी थंडगार होईल. एकाच ठिकाणी गर्दीचा लोड येऊ नये म्हणून संत निवृत्तीनाथ मंदिराच्या भागात तीन ठिकाणी उटी वाटप केंद्रे करण्यात आल्याची माहिती प्रशासन, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे (Police Inspector Sandeep Ranadive) यांनी दिली.

दुपारी संत निवृत्तीनाथांच्या समाधीस महापूजने उटी लावण्यात येईल व रात्री पूजेने, कीर्तनाने उटी उतरवून भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येईल, अशी
माहिती शासन समितीचे ऍड. भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली.

दरम्यान उटी वारीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेच्या (Trimbak Nagarparishad) वतीने सफाई व आरोग्य विभाग सज्ज असून या अभियानात माझी वसुंधरा अभियान राबविले जाईल, अशी माहिती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.