नाशिक । प्रतिनिधी
सिडको परिसरात दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही भोंगे लावू नये, यासाठी विभागातील मनसेच्या शहराध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यानंतभोंग लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर व परिसरात कोणीही जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कुठल्याही माध्यमातून करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, विनापरवानगी शहरात डीज किंवा भुंगे लावण्याबाबत यापूर्वीच कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे भोंग्यांच्या राजकारणातून त्या आदेशाची पायमल्ली होता कामा नये असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ठणकावून सांगितले आहे. जुने नाशिक परिसरातील भद्रकाली येथील एका मंदिरात मनसेने भोंगे लावून हनुमान चालीसाची ध्वनिफीत लावली होती. यानंतर पांडे यांनी या पार्श्वभूमीवर कुणीही कायदा व सुव्यवस्थेचा भोंग करू नये, यापूर्वी विनापरवानगी साऊंड सिस्टिम डीजे, लाऊड स्पीकर न लावण्याचे आदेश दिले गेलेले आहेत, त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पांडे यांनी सांगितले.
नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री महाराज भोंगा प्रश्नावर आक्रमक :
सिडको परिसरात दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही भुंगे लावू नये यासाठी विभागातील मनसेच्या शहराध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये दिलीप दातीर यांच्यासह अर्जुन वेताळ, संदेश जगताप, ललित वाघ, तुषार जगताप, अर्चना पाटील, कामिनी दोंदे, अक्षय खांडरे, राजु परदेशी आदींन कलम सीआरपीसी १४९ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर भोंगे लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनसे पदाधिकारी आक्रमक :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराबाहेर हनुमान चालीसा लावण्याचे सांगितले. त्यानंतर सोमवारी सकाळी भद्रकाली परिसरातील मंदिरा बाहेर भोंग्या वरून हनुमान चालीसाची ध्वनिफीत लावण्यात आली. यावेळी पोलिसांच्या परवानगी बाबत विचारले असता अद्याप परवानगी घेतलेली नाही असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. दरम्यान याप्रकरणी पांडेय यांनी माध्यमांसमोर बोलताना जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही.
त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई पोलिसांकडून करण्यात येईल, राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र येत्या तीन-चार दिवसात मज्जिद वरील भोंगे नाही उतरवले तर मनसे पदाधिकारी देखील भोंगे लावण्यावर ठाम राहतील अशी आक्रमक भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.