नाशिक । प्रतिनिधी
जेवढा देश मुस्लिमांचा तेवढाच हिंदूंचा देखील असून दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही असे निर्णय घेऊ नये, मात्र भोंग्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे, असे वक्तव्य महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी केले आहे.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नुकताच भोंगे मनाई आदेश काढला आहे. त्यानुसार ०३ मे पर्यंत भोंगे संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्या संदर्भात परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. या सर्व निर्णयाचे साधू महंतांनी स्वागत केले आहे. भोंग्यांबाबत कार्यवाही करण्याचा जो मानस घेतला आहे, त्याच स्वागत असल्याचे महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे.
ते यावेळी म्हणाले कि, जेवढा देश मुस्लिमांचा तेवढाच हिंदूंचा देखील आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही असे निर्णय घेऊ नये, भोंग्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे. मात्र मस्जिद समोर १०० मिटर अंतरावर भोंगे लावता येणार नाही , अजानच्या आधी १५ मिनिटे व नंतर १५ मिनिटे हनुमान चालीसा लावू नये हे पोलिस आयुक्तांच वाक्य निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक धर्माच्या विशिष्ट सण उत्सवासाठी समान नियमावली बनवून त्या त्या कार्यक्रमासाठी सरकार ने भोंग्यांसाठी तेवढ्यापुरती परमिशन द्यावी, मात्र दैनंदिन कारणासाठी धर्मिकतेसाठी कोणत्याच धर्माला परमिशन देऊ नये , असेही त्यांनी यावेळी सांगितले.